PM Narendra Modi : देशाला वाचवाचयं असेल तर मोदींना संपवा; काँग्रेस नेत्याच्या विधानाने देशात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

PM Narendra Modi : देशाला वाचवाचयं असेल तर मोदींना संपवा; काँग्रेस नेत्याच्या विधानाने देशात खळबळ

जयपूरः राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी उद्योगपती अंबानी-अदाणी यांच्यावरुनही केंद्र सरकारला टार्गेट केलं आहे. काँग्रेस सरकार आलं तर त्यांना तुरुंगात टाकू, असंही रंधावा म्हणाले.

सुखजिंदर रंधावा यांनी काँग्रेस नेत्यांना आपसातील मतभेद विसरण्याचं आवाहन करत मोदींना संपवण्यावर लक्ष केंद्रीत करा, असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आपलं आपसातील भाडणं आता संपवा. मोदींना संपवण्यासाठी काय करावं लागेल, त्यावर विचार करा. जर मोदी संपले तर देश वाचेल. जर मोदी राहिले तर देश संपून जाईल.

हेही वाचाः देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

अदाणी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या वतीने राजभवनाला घेराव घालण्यात आला. यावेळी रंधावा बोलत होते. रंधावा हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते पुढे म्हणाले की, ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. या कंपनीने पूर्ण हिंदुस्थानला कंगाल केलं. तसंच मोदींनी अदाणी यांना ईस्ट इंडिया कंपनी बनवून देशात व्यापार सुरु केला आहे. ही लोकं देशाचा सत्यानाश करतील. त्यामुळे पुन्हा एकदा भारत गुलामीकडे वाटचाल करीत आहे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही पंजाबमध्ये राहातो. आम्हाली माहितंय पाकिस्तान देश सध्या काय करतोय, चीन काय करतोय. मोदी म्हणतायत, घुसून मारेन. परंतु त्यांचं सगळं अदाणी ठरवतात. त्यामुळे आपण एकजूट राहिलं पाहिजे. आझादीसाठी लढणाऱ्यांनी कधीच स्वातंत्र्यानंतर मंत्री बनेल, असा विचार केला नव्हता. त्यांच्या डोक्यात फक्त इंग्रजांना हाकलून देण्याचा विषय होता. आजही आपण मोदींना संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

टॅग्स :RajasthanPM Narendra Modi