esakal | Breaking:सचिन पायलटच म्हणतात, 'काँग्रेस सरकार धोक्यात'
sakal

बोलून बातमी शोधा

gehlot government in minority

पायलट यांना 30 आमदारांचा पाठिंबा असून, अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात असल्याचे पायलट यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या संदर्भात पीटीआयने ट्विटही केले आहे.

Breaking:सचिन पायलटच म्हणतात, 'काँग्रेस सरकार धोक्यात'

sakal_logo
By
पीटीआय

जयपूर (राजस्थान) : राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज, स्वतः राजस्थानातील सरकार धोक्यात असल्याची माहिती दिली आहे. पायलट यांना 30 आमदारांचा पाठिंबा असून, अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात असल्याचे पायलट यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या संदर्भात पीटीआयने ट्विटही केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पायलट संतप्त 
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना ‘एसओजी’ने नोटीस पाठवून जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश मिना यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, या नोटिशीमुळे खवळलेल्या सचिन पायलट समर्थक आमदारांना घेऊन थेट दिल्लीत पोहोचले असून सोनिया गांधी, राहुल गांधींपुढे गाऱ्हाणे मांडण्याच्या प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ नेते अहमद पटेल, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशीच त्यांची भेट होऊ शकली. सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरुद्धच्या तक्रारींचा पाढा या नेत्यांपुढे मांडला. काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनीही आमदारांमध्ये नाराजी असल्याचे मान्य केले. मात्र, भाजपकडून गैरफायदा घेण्याचा प्रकार सुरू आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

गेहलोतांकडे नेत्यांची गर्दी 
जयपूर : राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप होत असताना आज राज्यातील अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची निवासस्थानी भेट घेतली. ग्रामविकास मंत्री शांती धारिवाल, आरोग्यमंत्री रघू शर्मा, वाहतूक मंत्री प्रताप सिंह काछरियावाज आणि कामगार मंत्री तिकाराम जुलै यांनी गेहलोत यांची भेट घेतली. याशिवाय काही अपक्ष आमदारही गेहलोत यांना भेटले. कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचे भाजपचे षडयंत्र उघड झाले असून ते सरकार पाडण्यात यशस्वी होणार नाहीत, असा दावा काछरियावाज यांनी केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री गेहलोत यांनीही राजकीय संकटाला भाजपलाच जबाबदार धरले. आमदारांना आमिष दाखवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कॉंग्रेसचे सरकार सहन होत नाही आणि त्यामुळे ते कारस्थान करत आहेत, असा आरोप केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा