टँकर-ट्रकची भीषण धडक; चार जणांचा होरपळून मृत्यू : Rajasthan Fire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire at accident

Rajasthan Fire: टँकर-ट्रकची भीषण धडक; चार जणांचा होरपळून मृत्यू

अजमेर : ट्रक आणि गॅस टँकरच्या भीषण धडकेत चार लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानातील अजमेर इथं घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून त्यात झालेल्या जीवितहानीमुळं हळहळ व्यक्त होत आहे. (Rajasthan Four people burn alive in tanker truck collision in Ajmer)

पोलिसांच्या माहितीनुसार, जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला, त्यामुळं या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चार व्यक्तींना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. यावेळी गॅस टँकरमधून ज्वलनशील पदार्थ बाहेर आल्यानं जवळून जाणाऱ्या दोन वाहनांनी देखील पेट घेतला.

दरम्यान, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आग भडकल्यानं रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता, तसेच मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी रस्त्यावर जमली होती. तसेच या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले.

या घटनेनंतर सर्व बडे प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :RajasthanfireDesh news