कंडोम जाहिरात बंदीप्रकरणी मोदी सरकारला नोटीस 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवरून राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नांद्राजोग व न्या. डी. सी. सोमानी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस पाठविली.

जयपूर : टीव्ही चॅनेलवर सकाळी सहापासून रात्री दहा वाजेपर्यंत कंडोमच्या जाहिरातींवर केंद्र सरकारने बंदी आणली असून याप्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे.

या नोटिसीद्वारे न्यायालयाने कंडोमच्या जाहिरातींवर बंदी आणण्यामागील कारणांबाबत विचारणा केली आहे. 

एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवरून राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नांद्राजोग व न्या. डी. सी. सोमानी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस पाठविली. 11 डिसेंबरला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कंडोम जाहिरातींच्या प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली होती. 

Web Title: Rajasthan HC issues notice to I&B ministry on condom ad restrictions