भाजप राहणार की जाणार; 'सेमिफायनल'चा आज निकाल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांतील साडेआठ हजारांहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या मतमोजणीनंतर निश्‍चित होणार आहे. सर्वांत जास्त म्हणजे 2,907 उमेदवार मध्य प्रदेशात होते. येथेच सर्वाधिक 65,367 यंत्रांचा वापर केला गेला. ही सर्व मतदान यंत्रे पाचही राज्यांमधील स्ट्रॉमरूममध्ये मोठ्या सुरक्षेखाली ठेवण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवू शकणाऱ्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (ता. 11) जाहीर होणार आहेत. 

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांतील साडेआठ हजारांहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या मतमोजणीनंतर निश्‍चित होणार आहे. सर्वांत जास्त म्हणजे 2,907 उमेदवार मध्य प्रदेशात होते. येथेच सर्वाधिक 65,367 यंत्रांचा वापर केला गेला. ही सर्व मतदान यंत्रे पाचही राज्यांमधील स्ट्रॉमरूममध्ये मोठ्या सुरक्षेखाली ठेवण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक स्ट्रॉंगरूम आहे. पाच राज्यांत एकूण 679 विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, राजस्थानमधील एके ठिकाणी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 678 ठिकाणीच मतदान झाले. उद्या सकाळी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉगरूम उघडण्यात येतील. त्यानंतर मतमोजणी केंद्रांवर ही यंत्रे नेली जातील. 

ही निवडणूक म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम समजली जात असल्याने सर्व देशाचे लक्ष निकालांकडे लागले आहे. या निवडणुकीत भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे; तर कॉंग्रेससमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. 

मतदान यंत्रे आणि उमेदवार 
1.74 लाख : मतदान यंत्रे 
678 : स्ट्रॉगरूममध्ये यंत्रे बंदिस्त 
8500 : उमेदवार 
 
Web Title: Rajasthan Madhya Pradesh Telangana Chattisgarh Mizoram states assembly election vote counting