कतरिनाच्या गालासारखे असावेत रस्ते ; राजस्थानच्या मंत्र्यांच अजब वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Gudha

कतरिनाच्या गालासारखे असावेत रस्ते ; राजस्थानच्या मंत्र्यांच अजब वक्तव्य

नवी दिल्ली : राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील (Ashok Gehlot Government) राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते असावेत, असे वादग्रस्त विधान गुढा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर शाब्दिक वाद उसळण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर गुढा पहिल्यांदाच त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले आहे.

पाँख गावात स्वागत समारंभ कार्यक्रमात नागरिकांनी ज्यावेळी चांगल्या रस्त्यांची मागणी केली, त्यावेळी गुढा यांनी सुरुवातीला रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असावे असे विधान केले. दरम्यान, चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीचे नाव आपल्या लक्षात नसल्याचे म्हंटल्यानंतर नागरिकांकडून कतरिना कैफचे नाव पुढे आले. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्याला गुढा यांनी गमतीत माझ्या परिसरातील रस्ते कतरिना कैफच्या गालासारखे व्हावेत असे म्हंटले. दरम्यान, राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून मंत्र्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओहीदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी गुढा यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील विकासकामे आणि योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्री गेहलोत यांच्या धावपट्टीवर सचिन पायलट

लालूही अडकले आहेत वादात

रस्त्याची तुलना अभिनेत्रीच्या गालांशी होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी लालू प्रसाद यादव यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. त्यांच्या या विधानानंतर बराच वाद झाला होता.

रविवारीच मंत्र्यांनी घेतली शपथ

राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसच्या 15 आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल कलराज मिश्रा यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापैकी 11 आमदारांनी मंत्रिमंडळाची तर चार आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस सरकार पुढील महिन्यात आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण करत असून मंत्रिमंडळातील हा पहिलाच फेरबदल असून याकडे पक्षाच्या हायकमांडचा प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

loading image
go to top