Lok Sabha 2019 : भाजपच्या विजयरथाला काँग्रेसचा 'हात' रोखणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच महिने अडखळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच महिने अडखळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम या पाच राज्यांमधील रणधुमाळी आज संपली. यापैकी राजस्थानमधील भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसला सहज विजय मिळेल, असा बहुतांश 'एक्‍झिट पोल'चा अंदाज आहे. मध्य प्रदेशमधील शिवराजसिंह चौहान यांची एकहाती सत्ता यंदा धोक्‍यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीची लढत असल्याचे या मतदानोत्तर चाचण्यांमधून समोर आले आहे. रमणसिंह यांच्या छत्तीसगडमध्येही भाजपला धक्का बसू शकतो; मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार असली, तरीही या राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरेल असेही चित्र आहे. 

एकूण पाच राज्यांमध्ये निवडणूक असली, तरीही देशाचे लक्ष राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांवर होते. या तीनही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे येथे भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला, तर लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच विरोधी पक्षांना बळ मिळेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठीही या निवडणुकांचे निकाल महत्त्वाचे असतील. 

विविध संस्थांचे एक्‍झिट पोल 
छत्तीसगड : 

संस्था काँग्रेस भाजप इतर
टाईम्स नाऊ 35 46 9
रिपब्लिक-सी व्होटर 40-50 35-43 3-7 
न्यूज मोशन 40-44 38-42 0-16
इंडिया टुडे 55-65 21-31 4-8

तेलंगणा : 

संस्था काँग्रेस-टीडीपी टीआरएस भाजप इतर
टाईम्स नाऊ 37 66 7 9
रिपब्लिक-सी व्होटर 38-52 50-65 4-7 8-14
इंडिया टुडे 21-33 79-91 1-3 0

मध्य प्रदेश : 

संस्था काँग्रेस भाजप इतर
टाईम्स नाऊ 89 126 15
इंडिया टुडे 104-122 126 4-11

राजस्थान : 

संस्था काँग्रेस भाजप इतर
टाईम्स नाऊ 85 105 9
इंडिया टुडे 55-72 119-141 0

 

Web Title: Rajasthan, MP, Chhatisgarh, Mizoram, Telangana Exit polls 2018 gives strength to Congress