राजस्थानमध्ये रेल्वेचे डबे घसरले;12 जखमी

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

बिकानेर - भटिंडा - जोधपूर पॅसेंजरचे नऊ डबे शनिवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात घसरले. यात बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रजियासरजवळ हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.

बिकानेर - भटिंडा - जोधपूर पॅसेंजरचे नऊ डबे शनिवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात घसरले. यात बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रजियासरजवळ हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.

अपघातामुळे बिकानेर- सुरतगड रेल्वे मार्ग बंद झाला असून, डबे रूळावरून काढण्याचे काम सुरू झाल्याचे उत्तर-पश्‍चिम रेल्वेच्या बिकानेर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्ग बंद झाल्याने जम्मूतावी एक्‍स्प्रेस, कोटा - श्रीगंगानगर एक्‍स्प्रेस दुसऱ्या मार्गावरून सोडण्यात आली. लालगड-अभोर पॅसेंजर व दिल्ली-बिकानेर एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली. जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून, अन्य प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. त्यांना नंतर त्यांच्या इच्छित स्थळी पाठवून देण्यात आले, अशी माहिती सजियासर पोलिस स्थानकाचे प्रमुख गणेश कुमार यांनी दिली.

Web Title: Rajasthan slipped to train coaches