डॉक्टर म्हणाले, 'मग तू सुद्धा कुत्र्याला चाव'

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जून 2019

एका महिलेला कुत्रा चावल्यानंतर महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली. यावेळी डॉक्टर महिलेला म्हणाले, 'मग तू सुद्धा कुत्र्याला चाव'. संबंधित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अजमेर (राजस्थान): एका महिलेला कुत्रा चावल्यानंतर महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली. यावेळी डॉक्टर महिलेला म्हणाले, 'मग तू सुद्धा कुत्र्याला चाव'. संबंधित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अजमेरमधीस डॉक्टरांच्या उत्तराने महिला रुग्णाला धक्का बसला.

एका महिलेला कुत्रा चावला म्हणून ती अजमेरच्या रुग्णालयात उपचारासाठी गेली. डॉक्टरच्या टेबलाजवळ गेल्यानंतर डॉक्टरने रागामध्ये 'तू सुद्धा कुत्र्याला चाव' असे सांगितले. डॉक्टरच्या या उत्तराने महिला रुग्ण संतापली. तुम्ही कधी कुत्र्याला चावला आहात का? असा प्रश्न या महिलेने डॉक्टरला विचारला. दोघांमध्ये झालेल्या वादाचा 57 सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, वाद सुरु असताना डॉक्टर महिलेला अॅट्रोसिटी कायद्यातंर्गत तक्रार दाखल करण्याची धमकी देताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मी प्रथमच रुग्णालयात आली आहे. त्यामुळे मला तुमची जात कशी माहित असेल? असे ही महिला बोलताना दिसते.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी के. के. सोनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan woman tells doctor dog bit her So bite the dog back he says Video goes viral