मराठीला अभिजात दर्जासाठी साहित्य संघांनी दिल्ली - मुंबईला धडक मारावी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

बेळगाव - सीमाभागात अनेक साहित्य संघांकडून मराठीचा जागर सुरु आहे, त्यांच्या या लढ्यात आम्ही उद्योजक कमी पडणार नाही, अशी ग्वाही देतानाच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संघांनी दिल्ली किंवा मुंबईला धडक मारावी, त्यामध्येही आमचा पुढाकार असेल, असे उद्योजक राजेंद्र मुतकेकर यांनी सांगितले.

कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथे रविवारी (ता. 23) बलभीम साहित्य संघ आयोजित तेराव्या मराठी संमेलनाची मुहूर्तमेढ आज रोपण करण्यात आली. अध्यक्षस्थानी परशराम गोवेकर होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री मुतकेकर बोलत होते.

ते म्हणाले, मराठी साहित्याची व्याप्ती खूप मोठी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून बहिणाबाई  ते आजच्या नवलेखकापर्यंत सर्वांनी मराठी भाषा समृध्द केली आहे. सहित्यामुळे समाज प्रगल्भ होत असतो. संतांच्या या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे मराठी साहित्याची कुचंबणा होत आहे.

सीमा भागात तर मराठी वाचविण्याचे संकट आहे. त्यासाठी साहित्य संघांची चळवळ मोलाची आहे. या चळवळीत आम्ही तुमच्या सोबत आहोत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आता दिल्ली किंवा मुंबईला धडक देणे गरजेचे आहे. त्यासाठीही आमचा पुढाकार असेल.

- राजेंद्र मुतगेकर

प्रारंभी विठू नामाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विनायक काकतकर आणि विनायक पाटील यांनी मुहूर्तमेढ रोवली. 

Web Title: Rajendra Mutgekar comment