#IFFI : रजनीकांत ठरले 'आयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबिली'

मंदार कुलकर्णी
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या पायाला हात लावून केलेला नमस्कार आणि अमिता बियाणी त्यांना प्रेमभरानं आलिंगन देणं हा शो स्टीलर मोमेंट ठरला.

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन समारंभाच्या किंचित फिकट चित्राची चौकट बुधवारी (ता.20) पूर्ण झाली ती चक्क सुरांनी. शंकर महादेवन आणि लुईस बँक यांच्या फ्युजन संगीताचा 440 वोल्टचा झटका बसला आणि कार्यक्रमाला विलक्षण ऊर्जा मिळाली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत असे दोन सुपरस्टार एकत्र येणं हे यंदाच्या उद्घाटन समारंभाचे वैशिष्ट्य होतं. या दोघांनी स्वतःच्या विनम्रतेच कोंदण या चित्राला दिलं आणि त्यातले रंग रसिकांच्या मनामध्येही भरत गेले. नेहमीसारखं चकचकाटी नृत्य आणि कलांचं प्रदर्शन नसलं तरी काही उत्कट क्षण दिल्यानं हा समारंभ उल्लेखनीय ठरला.

- शरद केळकर म्हणाला, शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज! अन् पुढे...

प्रयाण, एन्काऊंटर, सूर निरागस हो अशा एकामागोमाग एक येणाऱ्या फ्युजन रचनांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा पटच व्यापून टाकला. 'कोकण एक्सप्रेस' सारख्या रचनेत केवळ वाद्यांनी तयार केलेला रेल्वेचा आभास आणि शेवटी 'वैष्णव जनतो' ही रचना जगभरातल्या भाषेतून सादर करण्याचा प्रयोग अशा गोष्टी कल्पक आणि सर्जनशीलतेचा आनंद देणाऱ्या होत्या.

- हवा कुनाची रं? हवा फक्त आपलीच रं!; टीझरने उडवला 'धुरळा'

अमिताभ बच्चन यांच्या छोटेखानी भाषणाने रसिकांचे हृदय जिंकलं. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात बरोबर असणाऱ्या चाहत्यांमुळेच मी आहे, असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. लाईव्ह लिजेंड रजनीकांत यांनीही त्यांना मिळालेला पुरस्कार चाहत्यांना अर्पण केला.

रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या पायाला हात लावून केलेला नमस्कार आणि अमिता बियाणी त्यांना प्रेमभरानं आलिंगन देणं हा शो स्टीलर मोमेंट ठरला. माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट ही भारताची सॉफ्ट पॉवर असल्याचे सांगितलं आणि चित्रीकरण परवान्यांसाठी सिंगल विंडो यंत्रणेसाठी पाऊल उचलत असल्याची घोषणा केली.

- Tanhaji : 'तानाजी'च्या या 10 डायलॉग्जने लावलंय सगळ्यांना वेड!

या कार्यक्रमानं इफ्फी नावाच्या चित्रपटात वारीचा प्रारंभ झाला. सुमारे साडे तीनशे चित्रपट आता रसिकांना भेटतील आणि ही वारी आनंददायी बनत जाईल. त्याची नांदी उत्तम सुरांनी झाली एवढं नक्की! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth and Amitabh Bachchan inaugurated IFFI 2019 at Goa