31 डिसेंबरला राजकीय वाटचालीविषयी घोषणा: रजनीकांत

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय होण्याच्या दिशेने रजनीकांत यांची वाटचाल सुरु आहे. यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. राजकारण माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. फक्त उशीर झाला आहे. राजकारणातील प्रवेश विजयाप्रमाणे आहे.

चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपण 31 डिसेंबरला राजकीय वाटचालीविषयी घोषणा करणार असल्याचे आज (मंगळवार) जाहीर केले. 

गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय होण्याच्या दिशेने रजनीकांत यांची वाटचाल सुरु आहे. यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. राजकारण माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. फक्त उशीर झाला आहे. राजकारणातील प्रवेश विजयाप्रमाणे आहे. मी येत्या 31 डिसेंबरला पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करेन असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.

रजनीकांत यांनी चेन्नईच्या श्री राघवेंद्र कल्याण मंडपामध्ये चाहत्यांशी संवाद साधला. मागच्या काही महिन्यांपासून रजनीकांत सातत्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधून राजकीय चाचपणी करत आहेत. 18 जिल्ह्यांतून आलेल्या हजारांहून अधिक चाहत्यांशी त्यांनी संवाद साधला. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी त्यांच्या चाहत्यांची तीव्र इच्छा आहे. 

Web Title: Rajinikanth meets fans in chennai expected to announce his political debut