रजनीकांत राजकारणात येणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

रजनीकांत यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मला तमिळनाडू व देशासाठी काहीतरी करावयाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश करण्याच्या पर्यायाचा ते नक्कीच विचार करतील

चेन्नई - प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी आज (सोनवार) त्यांच्या निवासस्थानी हिंदु मक्कल कातची (हिंदु पीपल्स पार्टी) पक्षाचे सरचिटणीस रविकुमार व पक्ष नेते अर्जुन संपथ यांची भेट घेतली. रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर, ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

"रजनीकांत यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मला तमिळनाडू व देशासाठी काहीतरी करावयाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश करण्याच्या पर्यायाचा ते नक्कीच विचार करतील,'' असे संपथ यांनी यानंतर बोलताना सांगितले.

रजनीकांत यांना कालच नद्याजोड प्रकल्पास पाठिंबा दर्शविताना यासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली होती. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या राजकारणात पदार्पण करण्याच्या शक्‍यतेस आणखी बळ मिळाले आहे.

Web Title: Rajinikanth 'will consider joining politics'