'राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग' : तेजिंदरपालसिंग बग्गा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या भाषणात 1984 साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलींमध्ये काँग्रेस पक्षाचा सहभाग नव्हता असा दावा केला होता. त्यांच्या या विधानामुळे भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी दिल्लीत अनेक भागात 'राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग' असे होर्डिंग्ज लावले आहेत. यामुळे  पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील वाद आणखी चिघळणार आहे. 

मागील आठवड्यात झालेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशी तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे जनक असल्याचा आरोप करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावून आणखी वाद ओढवून घेतला आहे. या प्रकरणी माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी तेजिंदरपालसिंग बग्गा यांच्यावर काँग्रेसच्या वतीने दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

शीख दंगली प्रकरणी काँग्रेसला कधिही माफ करता येणार नसून, राजीव गांधी यांनी 1984 साली घेतलेल्या भूमिकेमुळे झालेल्या दंगलीतून शीख समाज आजून सावरू शकला नसल्याचे बग्गी यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वतः 'राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंर' असे ट्ट्विट केले आहे.

Web Title: Rajiv Gandhi The Father of Mob Leaching: Tejinder Pal Singh Bagga