#RajivGandhi75 : राजीव गांधींना देशभरातून अभिवादन

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे वडिलांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले आहे, की दुरदृष्टी व देशप्रेमी असलेल्या राजीवजींमुळे भारताच्या जडणघडणीत फायदा झाला. माझ्यासाठी ते खूप प्रेमळ पिता होते. त्यांनी कधीच द्वेष न करता कायम सर्वांवर प्रेम करायला शिकविले.

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75व्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, मुलगी प्रियांका गांधी वद्रा व त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळी म्हणजेच वीरभूमी येथे जाऊन अभिवादन केले. सद्भावना दिवस म्हणून हा दिवस ओळख जातो, काँग्रेसने देशभरात या आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे वडिलांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले आहे, की दुरदृष्टी व देशप्रेमी असलेल्या राजीवजींमुळे भारताच्या जडणघडणीत फायदा झाला. माझ्यासाठी ते खूप प्रेमळ पिता होते. त्यांनी कधीच द्वेष न करता कायम सर्वांवर प्रेम करायला शिकविले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून गांधी यांना अभिवादन केले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ व प्रमुख नेत्यांकडून राजीव गांधींना अभिवादन करण्यात येत आहे.

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. देशाचे सातवे पंतप्रधानपद त्यांनी भूषविले. राजीव गांधी हे देशातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. भारत सरकारने राजीव गांधी यांना 1991 रोजी सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. गांधी यांनी संगणकीकरणाला प्रोत्साहन दिले व संगणकयुगाची सुरवात केली. 1991 साली राजीव गांधी यांची प्रचारसभेदरम्यान फुटीरतावादी एलटीटीई या संघटनेकडून त्यांची हत्या करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Gandhi with pride and respect on his 75th birth anniversary.