शारदा चिट फंड घोटाळा; राजीवकुमार यांनी सीबीआय चौकशी टाळली

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

कोलकात्याचे माजी पोलिस महासंचालक राजीव कुमार यांना शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी रात्री समन्स बजाविले होते.

कोलकाता : कोलकात्याचे माजी पोलिस महासंचालक राजीव कुमार यांना शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी रात्री समन्स बजाविले होते.

त्यानुसार, कुमार आज सकाळी 10 वाजता सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहत शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी होणाऱ्या चौकशीला सामोरे जाणे टाळले.

कुमार यांनी सीबीआयला पत्र पाठवून चौकशी पथकासमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. राजीव कुमार हे कोलकाताचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असून त्यांना पश्चिम बंगाल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) चौकशीसाठी हस्तांतरित करण्यात आले आहे. तसेच त्यांना सहा दिवसांची सक्तीची रजाही देण्यात आली आहे.

काही सीबीआय अधिकारी कोलकात्यातील बारासट न्यायालयात आहेत. त्यांनी कुमार यांना चौकशीपासून वाचण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलण्यास विरोध केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Kumar Skips CBI Summons In Chit Fund Case