दिल्ली : राजीव रतन योजना खिळखिळी! ३००० घरे बनली जुगारांचा अड्डा

बवाना परीसरात जवळपास ४००- ५०० फ्लॅट आहे, जे केव्हापण भुईसपाट होऊ शकतात
Construction under Rajiv Ratan Awas Yojna
Construction under Rajiv Ratan Awas Yojnaटिम ई सकाळ

दिल्लीच्या बवाना येथे राजीव रतन आवास परियोजनाद्वारे (Rajiv Ratan Awas Yojana) बांधण्यात आलेले घरे स्मशानघाट बनत आहे. शुक्रवारला या परिसरात एका बिल्डींगमधील चार लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 2 जण गंभीर जखमी आहे. प्रशासनाने या प्रकरणावर एक समिती गठीत केली आहे. दिल्ली सरकार या प्रकरणी चौकशीची मागणी करत आहे.

बवाना परीसरात जवळपास ४००- ५०० फ्लॅट आहे, जे केव्हापण भुईसपाट होऊ शकतात. या परीसरातील लोकांचे म्हणणे आहे की राजीव रतन आवास परियोजनाद्वारे दिल्लीतील गरीबांना घरे बांधुन देण्यात आली मात्र बांधकामातील त्रुटी आणि अनेक बाबींवरील दुर्लक्षामुळे या घरांची अत्यंत दुरवस्था निर्माण झाली आहे. हाउसिंग परीसराच्या आतमध्ये शेकडो फ्लॅट्स असून ज्याकडे देखरेख विभागाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे हे फ्लॅट्स सध्या अय्याशीचे अड्डे बनले आहे. सोबत या ठिकाणी चोरीच्या घटनाही वाढत आहे.

Construction under Rajiv Ratan Awas Yojna
50 वेळा मुलाखतीत नापास होऊनही हार नाही मानली, गुगलने दिला 1 कोटी पगार

या परीसरात सुरक्षा गार्डचीही नियुक्ती करण्यात आली होती मात्र ते गार्ड उपस्थित नसतात, असा आरोपही परीसरातील लोकांनी केलाय. शुक्रवारला घडलेल्या घटनेने परीसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी न्याय मिळावा आणि योग्य कारवाई करावी, अशी मागणी परीसरातील लोकांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com