छतावरून फेकून मुलानेच केली आईची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

राजकोट - गुजरातमध्ये एका प्रोफेसरने मुलाने आपल्या आईची छतावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदिप नाथवानी असे या मुलाचे नाव असून, त्याची आई तीन महिने ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणावर पडून असल्याने आईच्या उपचार आणि देखभालीमुळे तो त्रस्त झाला होता. आईच्या आजारपणाला कंटाळल्याने आपण हे पाऊल उचचल्याचे संदिपने म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर महिन्यात घडली. परंतु, या घटनेचा खुलासा गुरुवारी झाला. एका निनावी चिठ्ठीनंतर पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मुलगा आईला छतावर घेऊन जात असल्याचे पोलिसांना अढळले. पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटच्या गांधीग्राममधील दर्शन अ‍ॅवेन्यूमध्ये राहणाऱ्या निवॄत्त शिक्षिका जयश्रीबेन विनोदभाई नाथवानी(64) यांचा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाला होता. हे प्रकरण पोलिसांनी आत्महत्या असल्याचे समजून सोडून दिले होते. परंतु, मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली. सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिलेचा मुलगा संदीप आपल्या आईला लिफ्टमधून छतावर घेऊन जाताना दिसला. 

डीसीपी करनराज वाघेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने चौकशीदरम्यान आईला पूजेसाठी घेऊन गेल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी आईने अडीच इंचाची रेलिंग कशी पार केली? असा प्रश्न विचारला असता तो निरुत्तर झाला. पोलिसांनी त्याला हिस्का दाखविल्यानंतर आईला छतावरून फेकल्याचे त्याने कबूल केले. 
 
Web Title: Rajkot professor pushes ill mother off terrace

टॅग्स