
President Election: राजनाथ सिंह यांचा CM उद्धव ठाकरेंना फोन
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर राष्ट्रपती निवडणुकीसाठी इतर पक्षांशी संपर्क करण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.
(Rajnath Singh Call To CM Thackeray Regard President Election)
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ आल्या असून भाजप आणि भाजपेतर विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी चालू केली आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यानंतर भाजपकडून खेळी खेळल्या जात आहेत. राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर त्यांच्या भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: भारतात धावली पहिली खासगी ट्रेन; 'भारत गौरव योजने'बद्दल माहितीये?
राष्ट्रपती पदासाठी एनडीएला पाठिंबा देण्यासाठी हा संपर्क भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचं सांगितलं जातंय. एनडीएचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भाजपने जे पी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर इतर पक्षांशी बातचीत करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आती शिवसेना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली
दरम्यान काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची ऑफर नाकारली आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससहित भाजपेतर पक्षांना एकत्र घेऊन एक उमेदवार देण्यासाठी योजना आखली होती. त्यासाठी त्यांनी शरद पवारांनी विचारले होते. पण मी अजून सक्रिय राजकारण करू शकतो असं म्हणत त्यांनी उमेदवारीसाठी नकार दिला होता.
हेही वाचा: OBC आरक्षणावरून 'वर्षा'वर मविआची बैठक; भुजबळ म्हणाले...
दरम्यान जुलैमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी यूपीए आणि एनडीएकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यूपीएकडून ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांना फोनवरून संपर्क साधला होता. त्यानंतर आता भाजपकडून आता खेळी खेळल्या जात आहेत. राजनाथ सिंह यांच्या फोननंतर महाराष्ट्रात भाजपला सोडचिठ्ठी देणारे उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Web Title: Rajnath Singh Call To Cm Thackeray President Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..