लष्करी सहकार्य वृद्धिंगत करणार; राजनाथ सिंह-लॉईड ऑस्टिन यांची भेट

नवी दिल्ली ः अमेरिका व भारतातील द्विपक्षीय मुद्दांवर शनिवारी चर्चा झाल्यानंतर हस्तांदोलनाऐवजी मनगटाद्वारे अभिवादन करताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह व अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड जेम्स ऑस्टिन.
नवी दिल्ली ः अमेरिका व भारतातील द्विपक्षीय मुद्दांवर शनिवारी चर्चा झाल्यानंतर हस्तांदोलनाऐवजी मनगटाद्वारे अभिवादन करताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह व अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड जेम्स ऑस्टिन.

नवी दिल्ली - महत्त्वाकांक्षी चीनला चाप लावण्यासाठी अमेरिकेने ‘क्वाड’ मधील सामूहिक सहकार्यानंतर भारताशी लष्करी पातळीवरील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला आहे. या मालिकेत अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी आज आपल्या पहिल्या भारत दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी सैन्य सामग्री आदान प्रदान यावर उभय देशांनी सहमती व्यक्त करणारे संयुक्त निवेदनही दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सादर केले. ट्रंप प्रशासनाप्रमाणेच ज्यो बायडेन प्रशासनाने देखील भारताशी मैत्री वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मालिकेत जपान, दक्षिण कोरिया या देशांच्या दौऱ्यानंतर ऑस्टिन यांचे भारतात आगमन झाले. संरक्षणमंत्र्यांच्या भेटीपूर्वी ऑस्टिन यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या बैठकीत संरक्षण सहकार्य, नव्याने समोर येणाऱ्या क्षेत्रात माहितीचे आदान प्रदान, लॉजिस्टिक्स सहकार्य या सह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. द्विपक्षीय, सामरिक भागीदारी व्यापक करण्याबरोबरच भारत प्रशांत क्षेत्रातील बदललेली स्थिती, दहशतवाद यावरही चर्चा झाली.पक्षीय सहकारी सामरिक भागीदारी व्यापक करण्याबरोबरच भारत प्रशांत क्षेत्रातील बदललेली स्थिती, दहशतवाद यावरही चर्चा झाली. संरक्षणमंत्री राजनाथ  सिंह यांनी सांगितले की दोन्ही देशांनी लष्करी पातळीवरील सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे.

संरक्षणमंत्री ऑस्टिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाशी व्यापक आणि फलदायी चर्चा झाली. वैश्विक सामरिक भागीदारी सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी दोन्ही देश उत्सुक  असून भारत अमेरिका भागीदारी २१ व्या शतकातील सर्वाधिक महत्त्वाची भागीदारी बनेल, अशी अपेक्षा असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तर लॉईड ऑस्टिन यांनी भारत दौरा बायडेन-हॅरिस प्रशासनाचा संदेश पोहोचविण्यासाठी आहे, असे स्पष्ट केले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com