ही काही माणुसकी नव्हे;राजनाथ सिंह संतापले

वृत्तसंस्था
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीर राज्यामधील अशांततेसंदर्भात चर्चा करण्यास येथील फुटीरतावाद्यांनी नकार दर्शविल्याने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (सोमवार) तीव्र नाराजी दर्शविली. 

काश्‍मीरप्रश्‍नी चर्चा करण्यासाठी सिंह यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ काश्‍मीरमध्ये दाखल झाले आहे. काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊन जनजीवन पुन्हा सुरळित व्हावे, असे ज्यांना वाटत आहे; त्यांचे चर्चेसाठी स्वागत असल्याचे सिंह यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले होते. मात्र हुर्रियत पक्षाच्या नेत्यांनी चर्चेसाठी नकार दिल्याने सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

""आमच्या शिष्टमंडळाचे काही सदस्य वैयक्तिक पातळीवर हुर्रियतच्या सभासदांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. मात्र फुटीरतावाद्यांनी यावर हो अथवा नाही, अशी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. किंबहुना, शिष्टमंडळाच्या सदस्यांना फुटीरतावाद्यांकडून ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली; त्याला काश्‍मीरियत, इन्सानियत वा जमुरियत, असे कुठल्याही प्रकारचे विशेषण लावता येणार नाही. याला माणुसकीही म्हणता येणार नाही. मी याआधीही हे स्पष्ट केले आहे. काश्‍मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. चर्चेसाठी आमचे द्वार खुलेच आहे,‘‘ अशी प्रतिक्रिया संतप्त सिंह यांनी व्यक्त केली.

Web Title: Rajnath Singh takes a dig at separatists in Kashmir