सीमावर्ती भागांत हव्यात भक्कम सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajnath sing

सीमावर्ती भागांत हव्यात भक्कम सुविधा

नवी दिल्ली - सीमेवरील भागांत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करून आपली क्षमता बळकट करावी, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते बांधणी संघटनेला (बीआरओ) केले. सीमावर्ती भागांत रस्तेबांधणीचे खडतर आणि आव्हानात्मक काम करणाऱ्या या संघटनेचा ६३वा स्थापना दिन शनिवारी झाला. या कार्यक्रमात राजनाथ यांनी चीनच्या संदर्भात भाष्य केले. पर्वतमय परिसरात वेगवेगळ्या भागांत वेगाने धडकण्यासाठी चीन बांधकाम करण्याची क्षमता वाढवीत आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ म्हणाले की, अलीकडच्या काळात चीनने उत्तरेकडील विभागात आपले अस्तित्व वाढविले आहे. वेगवेगळ्या भागांत वेगाने पोहोचणे चीनला शक्य झाले. बीआरओला त्यादृष्टिने काम करावे लागेल.

यासाठी बीआरओला आवश्यक पाठबळ पुरविण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे नमूद करून राजनाथ यांनी सांगितले की, २०२२-२३ या आर्थिक वर्षात या संघटनेच्या भांडवली अंदाजपत्रकात ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आता साडे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावरून देशाची सुरक्षा आणि सीमावर्ती भागांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा मुद्दा अधोरेखित होतो. सरकारच्या सर्वंकष संरक्षण धोरणानुसार सीमावर्ती भागांचा विकास हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे देशाची सुरक्षा साधनसामुग्री भक्कम होईल आणि दुर्गम भागांतील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल.

‘बीआरओ’ची कामगिरी

  • १९६० मध्ये दोन प्रकल्पांच्या निर्मितीसह प्रारंभ

  • ६० हजार किलोमीटरहून जास्त अंतराचे रस्ते

  • ८४० पूल बांधले

  • चार बोगद्यांचे बांधकाम

  • प्रतिकूल हवामान आणि भौगोलिक परिस्थितीत १९ हवाई तळांची निर्मिती

  • यातील काही प्रकल्प मित्र देशांत पूर्णत्वास नेत व्यूहात्मक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योगदान

Web Title: Rajnaths Appeal To Bro For Strong Facilities In Border Areas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top