केवळ 'होयबा' होऊ नका: राजनाथसिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लोकसेवादिनी अधिकाऱ्यांना सल्ला

नवी दिल्ली:  चुकीचे आदेश दिल्यावर केवळ "होयबा' म्हणून मान न हलविता त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कायम तटस्थ राहावे आणि निर्णय घेण्यात संकोच बाळगू नये, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले.

लोकसेवादिनी अधिकाऱ्यांना सल्ला

नवी दिल्ली:  चुकीचे आदेश दिल्यावर केवळ "होयबा' म्हणून मान न हलविता त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कायम तटस्थ राहावे आणि निर्णय घेण्यात संकोच बाळगू नये, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले.

लोकसेवा दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी राजनाथसिंह बोलत होते. "आयएसआय' दर्जाचे व अन्य सरकारी सेवेतील अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. ""राजकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश दिले तर त्यांना नियम दाखविण्यास कचरू नये. तुम्ही कायद्याने चुकीचे आहात हे त्यांना ठामपणे सांगा. " हॉं में हॉं ना मिलाएँ', असे सांगून चुकीच्या फायलींवर सह्या करू नका. तुमच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचा विश्‍वासघात करू नका,'' असे आवाहन त्यांनी केले.

""समाजात बदल घडवून आणण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करताना राजनाथसिंह म्हणाले, ""काम हे अधिकाऱ्यांना जबाबदारी, कर्तव्य व निःपक्षपातीपणाचे भान देते. प्रशासकीय सेवेत सत्ता आहे; पण या सत्तेमुळे मोठी जबाबदारी खांद्यावर येते हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. तुमच्याकडे तटस्थपणा नसेल तर तुमच्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.'' जे अधिकारी निर्णय घेणे टाळतात त्यांच्याविषयी बोलताना ""अशी मनोवस्था देशाच्या हिताला मारक असते,'' अशी टिप्पणी त्यांनी केली. गरज वाटत असेल तर तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा, मते मांडा; पण निर्णय घेण्यात कमी पडू नका, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला.

अधिकारीच "लेट कमर'
लोकसेवा दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम सुरू होण्यास काही मिनिटांचा विलंब झाला. हा संदर्भ घेत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वक्तशीर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ""प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कार्यक्रम 12 मिनिटे उशिरा सुरू झाला. तसेच कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतरही काही जण येत आहेत, हे पाहून याबद्दल मला खेद वाटतो. ""हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार होता. आम्ही पाच मिनिटे आधी पोचलो; पण कार्यक्रम नऊ वाजून 57 मिनिटांनी सुरू झाला. आपण निर्धारित वेळेपासून दूर जाऊ नये. आपण दिलेल्या शब्दांत काही त्रुटी आहेत का?,'' असा प्रश्‍न त्यांनी केला.

Web Title: rajnathsing gave Advice to the officers