वसाहतवादाचं प्रतिक असलेला राजपथ आता इतिहासात जमा - PM मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसाहतवादाचं प्रतिक असलेला राजपथ आता इतिहासात जमा - PM मोदी

वसाहतवादाचं प्रतिक असलेला राजपथ आता इतिहासात जमा - PM मोदी

नवी दिल्ली : वसाहतवादाचं प्रतिक असलेला राजपथ आता इतिहासात जमा झाला आहे. हा इतिहास आता कायमचा पुसून टाकण्यात आला आहे. आता कर्तव्यपथ नावाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो की, आपण आणखी एका वसाहतवादाचं प्रतिकातून बाहेर आलो आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं उद्घाटनं गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

मोदी म्हणाले, गेल्या आठ वर्षात आम्ही अनेक निर्णय घेतले जे ज्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. ते अखंड भारताचे पहिले प्रणेते होते, ज्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकावला होता.

दरम्यान, आम्ही आज इंडिया गेटजवळ नेताजींचा भव्य पुतळा उभारला आहे. ब्रिटिशांच्या काळात या ठिकाणी ब्रिटिशांच्या प्रतिनिधींचा पुतळा उभा होता. नेताजींच्या पुतळ्याच्या स्थापनेने आम्ही सशक्त भारतासाठी एक नवीन मार्ग प्रस्थापित केला आहे.

ब्रिटिशांच्या काळापासून सुरु असलेले अनेक कायदे आज बदलण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा समावेश आहे. नव्या शिक्षण धोरणामुळं आता देशाला परकीय भाषेच्या सक्तीतून मुक्त केलं जात आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Web Title: Rajpath A Symbol Of Colonialism Is Now Consigned To History Says Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiDesh news