सत्य नव्हे, राजपूत मते महत्त्वाची

उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 7 August 2020

सीबीआय चौकशीच्या मुद्यावर बिहारमधील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले,ही बाब आश्‍चर्यकारक आहे.आगामी निवडणूकीत हा मुद्दा तापविण्यासाठी व राजपूत मते आपल्याकडे खेचण्यासाठीच ही धडपड सुरु असल्याचे दिसत आहे.

पाटणा : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशीस परवानगी मिळाली आहे. सीबीआय चौकशीच्या मुद्यावर बिहारमधील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले, ही बाब आश्‍चर्यकारक आहे. मात्र, आगामी निवडणूकीत हा मुद्दा तापविण्यासाठी आणि राजपूत मते आपल्याकडे खेचण्यासाठीच ही धडपड सुरु असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास एक महिनाभर राजकीय आघाडीवर या मुद्याला महत्त्व नव्हते. मात्र, हा मुद्दा उचलून धरल्यास राजपूत मते मिळविता येतील, हे बहुतेक सर्वच पक्षांच्या लक्षात आल्याने सीबीआय चौकशीची झालेली मागणी सर्वांनीच उचलून धरली. राज्यात राजपूतांची लोकसंख्या आठ ते दहा टक्के आहे. राज्यातील राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि भाजप या तिन्ही मोठ्या पक्षांना राजपूतांची मते जातात. या मतविभागणीत राजदचा वाटा मोठा आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनीच सर्वप्रथम सीबीआय चौकशीची मागणी केली होती. नंतर भाजप आणि ‘जेडीएस’नेही सक्रीय होत सीबीआय चौकशीसाठी शिफारस केली आणि ती मंजूरही केली. राजपूत मतांबरोबरच सीबीआय चौकशीला मंजुरी देऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी साधल्याचे मानले जात आहे.   

हेही वाचा : सुशांतसिंह मृत्यु प्रकरण; सीबीआयतर्फे रियाविरोधात गुन्हा दाखल

सीबीआय चौकशीची शिफारस करून ती मंजूर करण्यात झालेली घाई पाहता सर्व गोष्टी आधीपासूनच ठरलेल्या होत्या आणि केवळ संधीची वाट पाहिली जात होती, असा अंदाज बांधता येतो. सुशांत प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यापेक्षा राजपूत मते हातातून सुटणार तर नाहीत ना, याची अधिक काळजी राजकीय पक्षांना वाटत असल्याची शंका येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajput votes important in upcoming bihar elections