राजस्थानात भाजपच्या दलित आमदाराचे घर पेटवले

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

भाजप आमदाराच्या घरावर सुमारे 40 हजारांच्या जमावाने हल्लाबोल केल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय करोलीतील भाजपच्या माजी आमदाराचेही घर जमावाने जाळले आहे. तसेच तेथील शॉपिंग मॉलची तोडफोडही करण्यात आली.

जयपूर : अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल करण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या बदलाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. करोली येथे भाजपच्या दोन दलित नेत्यांची घरे आंदोलकांनी जाळली आहेत. करोलीतील भाजपचे दलित आमदार राजकुमारी जाटव यांचे घर आंदोलकांनी पेटवले असल्याची माहिती मिळत आहे. 

भाजप आमदाराच्या घरावर सुमारे 40 हजारांच्या जमावाने हल्लाबोल केल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय करोलीतील भाजपच्या माजी आमदाराचेही घर जमावाने जाळले आहे. तसेच तेथील शॉपिंग मॉलची तोडफोडही करण्यात आली. भारत बंददरम्यान करोलीतील हिंडौसिटीमध्ये मोठ्या प्रमाणात लुट झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंद करणाऱ्यांच्या समर्थकांनी बाजारात घुसून लुटालूट करत मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले.

Web Title: Rajsthan BJP Dalit MLA House Fire by agitators