राज्यसभेचा वर्धापन दिन दिमाखात

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

नवी दिल्ली: संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी कायम आपले भरीव योगदान देणाऱ्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा 65 वा वर्धापन दिन सोहळा आज बालयोगी सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. राजकारणाचा वाराही न लागलेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. यानिमित्ताने कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली.

राज्यसभेचे प्रत्यक्ष कामकाज तीन एप्रिल 1952 पासून सुरू झाले असले, तरी या "कौन्सिल ऑफ स्टेट'ची पाळेमुळे थेट ब्रिटिश काळात 1919 पर्यंत मागे जातात. राज्यसभा लोकसभेच्या आधी अस्तित्वात आल्याने ते संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. भारतातील राज्यसभा ही इंग्लंडच्या "हाउस ऑफ लॉर्डस्‌'पेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, ती "राजसभा' नसून "राज्यसभा' आहे, असे मत माजी उपसभापती व ज्येष्ठ भाजप नेत्या नजमा हेप्तुल्ला यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केले होते. राज्यसभेच्या कामकाजाचा पसाराही तुलेनने जास्त असून सचिव, वार्तांकनकार, सुरक्षा व्यवस्था आदी शाखा मिळून या सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1400 वर पोचली आहे. 1995 पासून राज्यसभा स्थापना दिन साजरा केला जातो. 2012 पासून यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही होऊ लागले. यंदा या कार्यक्रमांचे पाचवे वर्ष होते. या वर्षी तीन एप्रिलला संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने स्थापनादिन आज साजरा करण्यात आला. राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी व उपसभापती पी. जे. कुरियन यांनी वर्धापन दिनाचे शुभेच्छा संदेश पाठविले होते. यानिमित्त कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण राज्यसभेचे अतिरिक्त सचिव मुकुल पांडे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त राज्यसभेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. "हे निवृत्त कर्मचारी हे राज्यसभेच्या सध्याच्या दिमाखदार स्वरूपाचे खरे स्तंभ आहेत,' अशा शब्दांत पांडे यांनी भावना व्यक्त केल्या. यानिमित्त माहिती-प्रसारण मंत्रालय, एनडीएमसी आदींच्या कालपथकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सायंकाळी हास्य कवी संमेलनात दिल्ली व उत्तर भारतातील नामवंत कवींनी हजेरी लावली.

Web Title: Rajya Sabha and Anniversary