राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'अनैतिक' विजय : मायावती

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

''या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे सपा-बसपा आमच्या युतीमध्ये कोणताही परिणाम होऊ शकत नाही. राज्यसभेत भाजपचा झालेला विजय हा अनैतिक आहे''.

- मायावती, सर्वेसर्वा, बहुजन समाज पक्ष

लखनौ : राज्यसभेच्या 58 जागांसाठी काल (शनिवार) मतदान घेण्यात आले. यातील बहुतांश जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ''या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे सपा-बसपा आमच्या युतीमध्ये कोणताही परिणाम होऊ शकत नाही. राज्यसभेत भाजपचा झालेला विजय हा अनैतिक आहे''.

Rajyasabha

मायावतींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, "पैसा, मसल पॉवर आणि राज्यातील यंत्रणेच्या बळावर सत्ताधारी पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी वापर केला. मात्र, त्यांनी समाजवादी पक्षावर आरोप केले नाहीत. मला भाजपला सांगायचे, की त्यांनी निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती तोडण्यासाठी केलेला गैरप्रकार यशस्वी झालेला नाही. तसेच कालच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले, की सप आणि बसप या पक्षांतील युतीला एक इंचही धोका पोचणार नाही''.

तसेच मायावती पुढे म्हणाल्या, ''गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा 'सूड' म्हणून त्यांनी भाजपने राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण लोकसभेत सर्वसामान्य मतदारांकडून निवडून दिले जाते आणि राज्यसभेत लोकप्रतिनिधी निवडून देतात, हे भाजप विसरला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Rajya Sabha polls Mayawati says loss won not affect SP BSP ties terms BJP win in immoral says Mayavati