निरोप समारंभावेळी राज्यसभा भावूक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

नवी दिल्ली : विविध चर्चांमध्ये आपापल्या पक्षीय भूमिकांना अनुसरून तावातावाने वाद घालणाऱ्या राज्यसभेतील वातावरण आज मात्र भावपूर्ण झाले होते... डी. राजा आणि डॉक्टर मैत्रेयन यांच्यासह पाच सदस्य वरिष्ठ सभागृहाच्या प्रथेप्रमाणे निवृत्त झाले... त्यांना निरोप देताना राज्यसभेने पक्षीय भूमिकांचे भेदाभेद अमंगळ काही काळ पूर्ण दूर ठेवले. या हळव्या क्षणी एकाच व्यक्तीची सर्वांना आठवण झाली आणि सभागृहातील कमतरताही जाणवली ते म्हणजे आजारपणामुळे सार्वजनिक जीवनापासून सध्या दूर असलेले माजी सभागृह नेते अरुण जेटली!

राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज कामकाजाच्या सुरुवातीलाच या पाचही सदस्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम केला. राजा यांच्या कथेतील भरीव कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. के अंजनंन, आर. लक्ष्मणन व सी रत्नवेलू यांनीही आपले विचार मांडले.

कधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राजा यांच्यासह साऱ्यांच्या सभागृहातील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. विशेषतः राजा यांचे अस्तित्व आता जाणवणार नाही हे प्रत्येकाने नमूद केले. अरुण जेटली यांच्या आठवणी प्रत्येकाने जागवल्या आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याची प्रार्थना केली.

डॉक्टर मैत्रेयन यांना निरोप घेताना अश्रू आवरले नाहीत. महिला आरक्षण विधेयक, भारत-अमेरिका अणूकरार, एका न्यायाधीशावर याच सभागृहाने केलेला अभूतपूर्व हक्कभंग ठराव या सर्व क्षणांचे आपण साक्षीदार होतो असे सांगताना मैत्रेयन यांना अश्रू आवरेनात.

राजा यांनी कॉम्रेड डांगे आणि जेष्ठ कम्युनिस्ट नेत्यांच्या कामगिरीचा पट उलगडला आणि आणि संसद सदस्य हे अखेर या देशातल्या गरीब पिडीत शोषित आणि वंचितांच्या हीतासाठीच कार्यरत असतात याचे स्मरण करून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा पहिल्याच वाक्याचा संदर्भ राजा यांनी दिला. सभागृहातील प्रत्येक चर्चेत आणि प्रत्येक समितीत अस्तित्व जाणवत असे असा उल्लेख नायडू आणि आझाद यांनीही केला. सभागृहनेते थावरचंद गेहलोत यांचेही भाषण झाले. अण्णाद्रमुकचे नेते नवनीत कृष्णन ज्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात बहार आणली.

नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा! 
डॉक्टर मैत्रेयन आणि मी 2009 मधील एका घटनेत तमिळनाडूत मरण पावलेल्यांना या सभागृहाने श्रद्धांजली देखील न वाहिल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून "माझ्या निधनानंतरही मला आदरांजली वाहण्याचा ठराव मंजूर करू नका' असे तीव्रपणे सांगितले. मात्र भाषण संपता संपता त्यांनी "नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे' या लता मंगेशकरांच्या गीताच्या ओळी अस्खलित हिंदीत उद्धृत केल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajyasabha get emotion on farewell of some Parliament members