चांद्रयानाच्या यशानंतर राज्यसभाही सुरळीत...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

नवी दिल्ली : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे अशा चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी इस्त्रोचे शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन करून या आनंदाच्या क्षणात आपणही कामकाज चालून सहभाग नोंदवूया असे आवाहन केले आणि राज्यसभेतील गोंधळ जणू जादूची कांडी फिरल्यागत थांबला.

नवी दिल्ली : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे अशा चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी इस्त्रोचे शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन करून या आनंदाच्या क्षणात आपणही कामकाज चालून सहभाग नोंदवूया असे आवाहन केले आणि राज्यसभेतील गोंधळ जणू जादूची कांडी फिरल्यागत थांबला.

हा सारा योगायोगाचा भाग मानला तरी राज्यसभाध्यक्षांनी यांनी चांद्रयानचे यश व ठप्प पडलेली राज्यसभा यांची अशी काही सांगड घातली की काॅंग्रेसचा विरोध व सभागृहातील गोंधळ तत्काळ थांबला, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.
सोनभद्र हत्याकांड व कर्नाटकातील सत्तानाट्याचा निषेध म्हणून विरोधकांनी राज्यसभेत आज सुरवातीपासूनच कामकाजात अडथळे आणले. त्यामुळे पूर्वार्धातील कामकाज ठप्प झाले. दुपारी दोन वाजता जेव्हा गृहमंत्रालयाच्या मानवाधिकार विधएयकाला चर्चा व मंजुरीसाठी आणण्यात आले तेव्हा तृणमूल काॅंग्रेस, काॅंग्रेस व आप ने ज्या पद्धतीने हे विधेयक मांडले गेले. त्याला नियम क्र.130 व 131 च्या आधारे आक्षेप घेतले. नियमानुसार लोकसभेत मंजूर झालेले विधायक जेव्हा राज्यसभेत आणले जाते तेव्हा खासदारांना त्यात दुरूस्त्या सुचवण्यासाठी कामकाजाचे किमान दोन दिवस द्यावे लागतात. मात्र सरकारने शुक्रवारी संध्याकाळी विधेयक मांडून आज ते थएट मंजुरीसाठी आणले.

या आक्षेपानंतर गदारोळ झाल्याने दुपारी तीनपर्यंत सभागृह तहकूब करावे लागले. या दरम्यानच्या काळातच चांद्रयानचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याने सभागृहात आनंदभावना व्यक्त झाली. या गोंधळात काँग्रेस व तृणमूल काँग्रेस सदस्यांनी हातातील कागद फाडून त्याचे तुकडे उपसभापतींच्या अंगावर भिरकावले. उपसभापती हरिवंश यांनी, हे मानवाधिकाराचे रक्षण आहे का, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.  

दुपारी तीनला नायडू स्वतःच सभागृहात आले व त्यांनी चांद्रयानच्या यशाबद्दल इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी एक आवाहन केले.

राज्यसभाध्यक्षांचे आवाहन
नायडू म्हणाले की, आम्ही वरिष्ठ सभागृह आहोत व येथए नियमांबरोबरच काही परंपराही आहेत. विधेयक मांडल्यावर मी आज दुपारपर्यंत दुरूस्त्या व हरकतींसाठी वाढीव वेळ दिला होता. चांद्रयानाने आपल्याला जो आनंदाचा क्षण दिला आहे त्या आनंदात आपणही शांततेत विधेयकावर चर्चा करून सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. असे सांगून नायडू आपल्या दालनात गेले. त्यांच्या आवाहनानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेस सदस्यांना गोंधळ बंद करण्याची सूचना केली. नंतर तृणमूलने सभात्याग केला व विधेकावरील चर्चा सुरळीत सुरू झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajyasabha working is continuous after Chandrayaan 2 mission