'एअरस्ट्राईकच्या पुराव्यासाठी सिब्बल बालाकोटला जाणार का?'

kapil sibal
kapil sibal

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकचा पुरावा मागणारे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राठोड म्हणाले, की कपिल सिब्बल आपल्या गुप्तचर यंत्रणांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही आंतरराष्ट्रीय माध्यमांवर विश्वास ठेवत आहात. माध्यमे जेव्हा म्हणतात की एअरस्ट्राईकमध्ये काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तुम्ही खूश होता. तुम्ही ईव्हीएमबाबत पुरावे आणण्यासाठी लंडनला गेला होता. तर, मग आता एअरस्ट्राईकचा पुरावा आणण्यासाठी बालाकोटला जाणार का?

कपिल सिब्बल यांच्यासह अन्य काही विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारकडे या हल्ल्याचे पुरावे मागितले होते. तर, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या हल्ल्यात 250 दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर या हल्ल्यावरून राजकारण सुरु झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com