रकबरचा मृत्यू मारहाणीमुळे 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

जयपूर (पीटीआय) : गो तस्करीच्या संशयावरून जमावाच्या हल्ल्याला बळी पडलेल्या राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रकबर खान या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल आज प्रसिद्ध झाला असून, मारहाणीच्या धक्‍क्‍यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय मंडळाच्या तीन सदस्यांनी ही शवविच्छेदन शस्त्रक्रिया केली होती. 

रकबरला जबर मारहाण करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या मंडळामध्ये डॉ. संजय गुप्ता, डॉ. अमित मित्तल आणि डॉ. राजीव गुप्ता यांचा समावेश होता. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रकबर खान याला रुग्णालयात दाखल करण्यातदेखील विलंब झाल्याचे उघड झाले होते. राजस्थान पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या समितीच्या आदेशावरून रामगड पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक मोहन सिंह यांना निलंबित करण्यात आले असून, अन्य तीन पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यात त्यांनी आपली चूक झाल्याचे मान्य केले होते. या व्हिडिओची दखल घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

Web Title: Rakbar death due to lynching