‘रक्षिता’ पोहोचवणार नक्षलग्रस्त भागात वेगाने वैद्यकीय मदत

यूएनआय
Tuesday, 19 January 2021

नक्षलग्रस्त भागात वेगाने वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि ‘सीआरपीएफ’तर्फे आज ‘रक्षिता’ या दुचाकी रुग्णवाहिकेचे उद्‌घाटन करण्यात आले. सुरक्षा जवानांना तातडीची वैद्यकीय मदत हवी असल्यास किंवा नक्षलग्रस्त भागात चकमकींवेळी जखमींना मदतीसाठी या गाड्यांचा वापर होणार आहे.

नवी दिल्ली - नक्षलग्रस्त भागात वेगाने वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि ‘सीआरपीएफ’तर्फे आज ‘रक्षिता’ या दुचाकी रुग्णवाहिकेचे उद्‌घाटन करण्यात आले. सुरक्षा जवानांना तातडीची वैद्यकीय मदत हवी असल्यास किंवा नक्षलग्रस्त भागात चकमकींवेळी जखमींना मदतीसाठी या गाड्यांचा वापर होणार आहे. 

शाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार? केंद्र सरकारने केला खुलासा

विजापूर, सुकमा, दंतेवाडा अशा नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये या दुचाकी रुग्णवाहिका अधिक उपयुक्त ठरणार आहेत. या जिल्ह्यांमधील दाट जंगलांमध्ये मोठ्या गाड्या किंवा रुग्णवाहिका नेणे अवघड जाते. नक्षलवादी भागांमधील अरुंद रस्त्यांवरून वेगाने जाण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्यांची आवश्‍यकता असल्याचे ‘सीआरपीएफ’च्या लक्षात आले. त्यानंतर या गाड्या विकसीत करण्यात आल्या. वैद्यकीय उपचार वेळेत पोहोचू न शकल्याने रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर बनल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे खास ‘सीआरपीएफ’साठी अशा २१ बाईक रुग्णवाहिकांचे उद्‌घाटन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुचाकी रुग्णवाहिकेतील सुविधा

  • ३५० सीसीच्या बुलेटचे रुग्णवाहिकेत परिवर्तन
  • रुग्णाला बसण्यासाठी खुर्ची, ऑक्सिजन सिलिंडरचीही सोय
  • रक्तदाब आणि ह्रदयाचे ठोके मोजण्याची यंत्रणा
  • एलसीडी स्क्रिनमुळे जखमीच्या प्रकृतीची माहिती मिळत राहणार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakshita Rapid medical aid to Naxal affected areas