महिलांनो सनी लिऑनसारखा आनंद द्या- राम

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई- महिलांनो हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिऑनलसारखा पुरुषांना आनंद द्या, असे वादग्रस्त ट्विट बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आज (बुधवार) जागतिक महिला दिनी केले आहे.

जागतिक महिला दिन आज जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 'स्त्री' शक्तील सलाम करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. राम गोपाल वर्माने सुद्धा महिलांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, वादग्रस्त ट्विट करताना म्हटले आहे की, महिलांनो सनी लिऑनलसारखा पुरुषांना आनंद द्या. महिला दिनाला पुरूष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरूषच हा दिवस जास्त साजरा करतात.'

राम गोपाल वर्माच्या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. राम गोपाल वर्माने यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. 'जो देव स्वत:चे शीर वाचवू शकला नाही तो इतरांचे रक्षण कसे करेल? हे मला कोणी सांगेल का' असे वादग्रस्त ट्विट वर्माने केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांच्यावरही यापुर्वी टीका केली होती.

दरम्यान, राम गोपाल वर्माने महिलांबाबत वादग्रस्त ट्विट केल्यामुळे नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठविली आहे. परंतु, वादग्रस्त ट्विट करून पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

Web Title: Ram Gopal Varma had some choice words to share on Women's Day