
Ayodhya Mosque : अयोध्येतील राम मंदिराचे काम प्रगतीपथावर; मशिदीबाबतही आली मोठी अपडेट; आता...
नवी दिल्ली - अयोध्या विकास प्राधिकरणाने (एडीए) शुक्रवारी येथील धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाला अंतिम मंजुरी दिली. बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन दिली होती, ज्यावर इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टद्वारे मशीद, हॉस्पिटल, संशोधन संस्था, कम्युनिटी किचन आणि लायब्ररी बांधकाम करायचे आहे.
एडीएने मंजूरी न दिल्याने आणि जमिनीचा वापर बदलल्यामुळे मशिदीचे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ रखडले होते. अयोध्येचे विभागीय आयुक्त आणि एडीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी शनिवारी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत आम्ही अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. काही विभागीय औपचारिकतेनंतर मंजूर झालेले नकाशे काही दिवसांत इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनकडे सुपूर्द केले जातील.
ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले की, सर्व मंजुरी मिळाल्यानंतर एक बैठक घेतली जाईल आणि मशिदीच्या बांधकामाची योजना अंतिम केली जाईल. हुसैन म्हणाले, 'ट्रस्टची बैठक 21 एप्रिल रोजी संपणाऱ्या रमजाननंतर होणार आहे. त्या बैठकीत मशिदीचे बांधकाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली जाईल.
हुसैन म्हणाले, "आम्ही २६ जानेवारी २०२१ रोजी मशिदीची पायाभरणी केली, अयोध्या मशिदीची पायाभरणी करण्यासाठी आम्ही हा दिवस निवडला होता, कारण सात दशकांपूर्वी या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.