कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कर्फ्यू लावण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनाला रोखायचं असेल, तर गर्दी टाळणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनीही यास दुजोरा दिला आहे.

Coronavirus : लखनऊ : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून आले. रुग्णांची संख्या वाढत चालली असली तर कोरोनाचा यशस्वी सामना करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, ही एक चांगली बातमी आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये यंदा राम नवमीचा उत्सव साजरा होणार का? याची चर्चा रामभक्तांमध्ये सुरू आहे. याबाबत रामजन्मभूमी न्यास आणि विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका जाहीर केली आहे. कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत उत्सव साजरे केले जाणार नाहीत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवत रामजन्मभूमी न्यास आणि  विश्व हिंदू परिषदेने यंदा रामनवमी उत्सव साजरा केला जाणार नाही, असे जाहीर केले. 

- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी

विहिंपचे अखिल भारतीय सह-सरचिटणीस डॉ. सुरेंद्र कुमार जैन यांनी द क्विंट या वृत्तवाहिनेशी बोलताना सांगितले की, 'विहिंपद्वारे देशभरात आयोजित करण्यात येणारे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. दिल्लीमध्ये एका समारंभाला ५० पेक्षा जास्त नागरिक जमणार नाहीत. आणि असे आढळून आल्यास कार्यक्रम रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश स्थानिक सरकारने दिले आहेत. त्यामुळे यंदा मोठा उत्सव साजरा न करता घरगुती पद्धतीने राम नवमी उत्सव साजरा करण्यास सांगितले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करणे महत्त्वाचे आहे. आणि प्रशासनाला विहिंपचा पाठिंबा आहे.'

 - Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तरुणांना केलंय आवाहन; म्हणाले...

यंदा राम नवमी उत्सव हा थोडक्यात साजरा करण्यात येईल. आमचा सरकारला पाठिंबा असून आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी माहिती राममंदिराचे पुजारी महंत सतेंद्र दास आणि महंद कल्याण दास यांनी दिली आहे. तसेच यंदा राम नवमीचा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यक्रम अधिकाऱ्यांनी दिली असल्यामुळे यंदा कोणताही भव्य उत्सव होणार नाही, अशी माहिती विहिंपच्या लखनऊ कार्यालयातील सदस्यांनी सांगितले आहे. 

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वॉलमार्ट करणार दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कर्फ्यू लावण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनाला रोखायचं असेल, तर गर्दी टाळणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनीही यास दुजोरा दिला आहे. राम नवमी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बहुतेक सर्वच ठिकाणचे उत्सव रद्द करण्याचे आवाहन लखनऊच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Mandir Trust announced that the Ayodhya Ram Navami Mela canceled due to coronavirus