'पारदर्शक' असल्याने राममंदीर दिसेना- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबईचं आम्ही पाटणा केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?, असा सवाल करीत त्यांनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली.

मुंबई- मुंबईचा पाटणा केलाय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणणे हा मुंबईचा, मुंबईकरांचा अपमान आहे, असे सांगतानाच भाजपने आश्वासन दिल्याप्रमाणे आयोध्येत राम मंदीर उभारलं आहे. पण, ते पारदर्शक असल्यामुळे दिसत नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

देश बदल रहा है म्हणणारे मोदी महाराष्ट्रात 27 वेळा आले. त्यांना इतक्या वेळा येथे प्रचारासाठी येण्याची गरज का पडते, असा सवाल करीत मोदींनी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी यावेच. त्यांना आमचे खासदार जाऊन मोदींना शिवसेनेच्या महापालिकेच्या विजयी सभेचे निमंत्रण आताच देतील, असे ते म्हणाले.

कल्याण डोंबिवलीला सहा हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप त्यांनी एकही रुपया दिलेला नाही. 

उद्धव म्हणाले...

 • पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान
 • मोदी रोज नव्या देशात असतात, म्हणून त्यांना वाटतं ‘देश बदल रहा है’
 • केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही
 • कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले
 • कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही
 • आमचं एकतरी काम खोडून दाखवा, हे माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आव्हान
 • मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत
 • मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत?
 • मुंबईत शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेने बांधली, सरकारने नाही
 • सफाई कामगारांना हक्काचं घर देणार
 • मेट्रोचा शोध भाजपने नाही लावला, मेट्रो काँग्रेसने आणलीय
 • यांच्या स्टेजवर पप्पू कलानी, एन डी तिवारी, हे यांचं परिवर्तन, असं परिवर्तन तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकरांना नको 
 • यांना लाज, लज्जा, शरम नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवाने बोलायला लागतंय. कारण यांच्या बापाने दिलेला अहवाल यांना दिसत नाही. खणखणीत सत्य दिसत नाही
   
Web Title: ram mandir is unseen because it's transparent like bjp