अयोध्येत राम मंदिर होतं, आहे आणि राहणार: योगी आदित्यनाथ

yogi adityanath
yogi adityanath

अयोध्या : अयोध्येत राम मंदिर होतं, मंदिर आहे आणि मंदिर राहणार यात शंका नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

अयोध्येमध्ये योगी आदित्यनाथ दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत. रामलिला आणि हनुमानगढी मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'अयोध्या मंदिराबाबत संविधानाच्या चौकटीत राहून सरकार काम करणार आहे. राम मंदिराबाबत लवकरच तोडगा निघेल. अयोध्येमध्ये लवकरच राम मंदिर उभे राहिल. अयोध्येत राम मंदिर होतं, मंदिर आहे आणि मंदिर राहणार यात शंका नाही. भगवान रामाच्या दर्शनीय मूर्तीसाठी दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. रामाची अशी मूर्ती तयार करायची आहे, जी अयोध्येची ओळख बनेल.'

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी कालच फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले आहे. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा त्यांनी केल्या. अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ ठेवले, तर भगवान श्रीराम यांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणाही योगी आदित्यनाथ यांनी केली. यापूर्वीच योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com