'हनीप्रीत, राम रहीम गुहेत खेळायचे 'बिग बॉस''

वृत्तसंस्था
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

राम रहीम याचे हनीप्रीतसोबत अनैतिक संबंध होते. हनीप्रीत आणि राम रहीमला नको त्या अवस्थेत पाहिले होते. हनीप्रीतने लग्नानंतर पहिली रात्री बाबाच्या गुफेतच घालविली होती. दोघांमध्ये बाप-लेकीचे नाते नव्हते. बिग बॉससारखा खेळ ते गुहेत खेळत आहे. सहा जोडपी 28 दिवस हा खेळ खेळत होती.

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम आणि त्यांची मानस कन्या हनीप्रीत यांच्यात दररोज गुहेत बिग बॉसचा खेळ चालत असे. ती रात्री कधीही माझ्यासोबत राहत नव्हती, असा खुलासा हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ता याने केला आहे.

गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून, सध्या तो कारागृहात आहे. राम रहीम याच्या अटकेनंतर हरियानात उसळलेल्या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी पोलिस हनीप्रीतचा शोध घेत आहेत. हनीप्रीतचा अद्याप शोध लागला नसताना तिचा पती विश्वास गुप्ताने अनेक खळबळनक आरोप केले आहे.

विश्वास गुप्ता म्हणाले, की राम रहीम याचे हनीप्रीतसोबत अनैतिक संबंध होते. हनीप्रीत आणि राम रहीमला नको त्या अवस्थेत पाहिले होते. हनीप्रीतने लग्नानंतर पहिली रात्री बाबाच्या गुफेतच घालविली होती. दोघांमध्ये बाप-लेकीचे नाते नव्हते. बिग बॉससारखा खेळ ते गुहेत खेळत आहे. सहा जोडपी 28 दिवस हा खेळ खेळत होती. त्या जोडप्यांमध्ये माझा आणि हनीप्रीतचाही समावेश होता. राम रहिमजवळ कायम शस्त्रास्त्रांनी भरलेला बॉक्स असायचा. तो बॉक्स घेऊनच राम रहीम प्रवास करत असे. बाबा खूप ताकदवान असून, तो कारागृहात राहूनही खूप काही करू शकतो. 

Web Title: Ram Rahim Made Us Play Big Boss in Dera: Honeypreet’s Ex-Husband