उजळला शरयू तीर

RamMandir
RamMandir

अयोध्या - लाखो दिव्यांनी उजळलेला शरयू घाट, रामल्ललाचा जयघोष करणारे रामभक्त, गल्लीबोळात लावलेले भगवे ध्वज, अयोध्यावासियांच्या चेहऱ्यावर दिसणारे अलौकिक समाधान आणि रामराज्याप्रमाणे सजलेली अयोध्यानगरी ! प्रत्येकाने डोळ्यात साठवावे आणि साक्षीदार व्हावे, असे वातावरण राम जन्मभूमी अयोध्यानगरीत अनुभवायला मिळत आहे. राम जन्मभूमीचा वाद ४९२ वर्षांचा आणि त्यातही न्यायालयीन पातळीवर हा लढा जवळपास ७० वर्षे सुरू राहिला. जागेच्या वादात वेगवेगळ्या टप्प्यांवर स्थित्यंतरे आली. मात्र, सात दशकांच्या प्रतीक्षेनंतर वाद निकाली निघाला.

विशेष म्हणजे मुस्लिम पक्षकार असलेल्या इक्बाल अन्सारी यांनाही या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्वागतार्ह निर्णय घेतला आणि त्याला अन्सारी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सोहळ्यात सहभागी होण्याचे ठरविले आहे.

एक हजार कोटीच्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ

  • राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्तावर अयोध्येचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते 51 प्रकल्प सुरु केले जातील. याचा एकूण खर्च एक हजार कोटी इतका असेल.
  • 14 किलोमीटर परिक्रमा मार्गावर चार किलोमीटर लांबी आणि 500 मीटर रुंदी असलेले सीता सरोवर बनविणार
  • अफीम कोठी ते राजघाट या मार्गावरील सरोवरात शरयू नदीचे पाणी सोडणार स्नान 
  • सरोवर देखरेख समितीचे प्रमुख डी. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे काम 
  • सआदतगंज ते अयोध्या मार्गावर नव्या घाटाची बांधणी
  • नव्या घाटालगत 30 किलोमीटर चौपदरीकरण मार्ग
  • आझमगढ ते अयोध्यामार्गे बहराईच या 36 किलोमीटर 700 मीटर मार्गाचे चौपदरीकरण
  • नगरविकास खात्यामार्फत पाणी पुरवठा योजना (54 कोटी खर्च)
  • अयोध्या शोध संस्थानच्या मार्गदर्शनाखाली तुलसी स्मारक भवनचे आधुनिकीकरण (16 कोटी 80 लाख रुपये)
  • राजकीय निर्माण निगमच्या मार्गदर्शनाखाली राम कथा पार्कचे विस्तारीकरण (दोन कोटी 70 लाख रुपये)
  • शरयू किनाऱ्यावरील या पार्कवर रामायण मेळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते
  • राजश्री दशरथ वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्यान कक्ष, नवी प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, शैक्षणिक विभाग, मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार (134 कोटी)
  • दर्शन नगर विभागीय रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरी व भाजलेल्यांवर उपचारासाठी कक्ष
  • नव्या बस स्थानाची निर्मिती (सात कोटी)
  • 200 कर्मचाऱ्यांची क्षमता असलेल्या पोलिस बराकीचे बांधकाम (सात कोटी)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अयोध्या दिनांक
बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाची माती अयोध्येत..! 
मिरा भाईंदरचे नगरसेवक विक्रम प्रताप सिंग शिवसैनिकांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरील माती हे शिवसैनिक सोबत घेऊन गेले आहेत. शरयू तीरावर ही माती ठेऊन, त्यासमोर ४९२ दिवे शिवसैनिक लावणार आहेत. 

घरा घरात रामायण आणि सुंदरकांड
राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी झाली असून यानिमित्ताने मंगळवारी अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली. उद्याही दिवाळीचेच वातावरण राहणार आहे. घरा घरात रामायण आणि सुंदरकांडचे पठण होत आहे. 

प्रत्येक पाहुण्याला चांदीचे नाणे
अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. या नाण्यावर राम दरबार तीर्थ क्षेत्र दर्शविणारे चिन्ह असेल. भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना नाणे देण्यात येणार आहे. या नाण्याचे वितरण श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र विश्‍वस्तांकडून होणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेत ४५ वर्षापेक्षा कमी वयाचा कर्मचारी
राम मंदिर भूमिपूजनामुळे अयोध्यानगरी दोन दिवसांपासून सिल करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे सुरक्षा व्यवस्थेत ४५ पेक्षा कमी वयाचे कर्मचारी निवडण्यात आले आहे. 

राम मंदिरावर टपाल तिकीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरावरील टपाल तिकीटाचे लोकार्पण करणार आहेत.  

कमलनाथ यांनी प्रोफाइल पिक्चर बदलला
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर खात्याचे प्रोफाइल पिक्चर बदलले आहे. नव्या फोटोत कमलनाथ हे भगवे उपरणे घातलेले दिसून येतात. 

रावण मंदिराचा पुजारी वाटणार लाडू
गौतमबुद्ध नगर - प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीत मंदिर उभारणीसाठी भूमिपूजनाचे विधी सुरु झाले असताना रावणाची जन्मभूमी मानल्या गेलेल्या बिसरख या गावातील रावण मंदिराचा पुजारीही याच क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे. भूमिपूजनाच्या दिवशी आपण आनंदोत्सव साजरा करत सर्वत्र लाडू वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

मुस्लिम धर्मियांत उत्साहाचे वातावरण
श्रीरामावर श्रद्धा असलेले असंख्य मुस्लिम धर्मिय भूमिपूजनानिमित्त श्रद्धा प्रकट करत आहेत. छत्तीसगडमधील फैज खान नामक युवक मंदिरनिर्मितीमधील योगदान निश्‍चित करण्यासाठी आपल्या गावातून अयोध्येत विटा पाठवत आहे. फैजाबादचा रहिवासी जमशेद खान म्हणतो की, आम्ही रामाला पूर्वज मानतो.हिंदूंच्या साथीत आम्ही आनंदोत्सव साजरा करू.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com