भाजपला सत्ता मिळाल्यास भव्य राम मंदिर बांधू- मौर्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. "उत्तर प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यास आयोध्या येथे भव्य राम मंदिर बांधण्यात येईल, असे उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मोर्य यांनी आज सांगितले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. दोन महिन्यांत ते बांधून होणार नाही. निवडणुकीनंतर राम मंदिर बांधण्यात येईल. राज्यात भाजप पूर्ण बहुमतासह सत्तेवर येईल.''
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ""ते मागासवर्गीय नाहीत की दलित नाहीत, ते फक्त विश्‍वासघाती आहेत. समाजवादी पक्ष हे बुडते जहाज आहे तर कॉंग्रेस कधीच बुडाली आहे. त्यामुळे त्यांच्या आघाडीत उद्या बसप जरी सहभागी झाला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. अखिलेश यांचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर गरज पडल्यास भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करेल व भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवेल.''

Web Title: ram temple build, says keshav prasad maurya