esakal | राम मंदिर उभारणीला होणार उशीर; बांधकामात येतायत अडचणी
sakal

बोलून बातमी शोधा

ram mandir

जगभरातील राम भक्तांना प्रतीक्षा असलेले अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिराला नियोजित तीन वर्षांच्या कालावधी पेक्षा अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

राम मंदिर उभारणीला होणार उशीर; बांधकामात येतायत अडचणी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अयोध्या- जगभरातील राम भक्तांना प्रतीक्षा असलेले अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिराला नियोजित तीन वर्षांच्या कालावधी पेक्षा अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण मंदिर साकरण्याच्या ठिकाणी २०० फूट खोदकाम करूनही पायासाठी अपेक्षित असलेला टणक खडक लागलेला नाहीय. त्यामुळे नियोजित तीन वर्षांपेक्षा अधिकचे सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो. राम जन्मभूमी निर्माण न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी ही माहिती दिलीय. मंदिर साकरण्यास अधिकचा कालावधी लागला तरी हरकत नाही, मात्र मंदिर मजबूतच तयार करून असंही महाराज म्हणाले.

मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. मंदिर बांधून तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मंदिर तीन मजली असणार आहे. शिवाय मंदिर वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात येईल. मंदिराच्या शिखराची उंची वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. याशिवाय घुमटांची संख्या तीनवरुन पाच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराच्या उंचीमध्ये 33 फूटांनी वाढ करण्यात येणार आहे. मंदिराच्या जून्या मॉडेलनुसार मंदिराची उंची 268 फूट होती. आता ती 280 ते 360 फूट करण्यात आलीये.

Google फोटोची फ्री सेवा मिळणं होणार बंद; मोजावे लागणार पैसे

जेथे रामलल्लाचा गाभारा बनणार आहे, त्याच्यावरील भागालाच शिखर केलं जाणार आहे. मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी घुमटांची संख्या पाच करण्यात आली आहे. राम मंदिराच्या पाच घुमटांच्या खाली चार भाग असणार आहेत. येथे सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप बनवले जाणार आहेत. येथे भाविकांच्या बसण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जागा असेल. मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी मंदिराच्या जमिनीचे क्षेत्रफळही वाढवण्यात आले आहे. माती परिक्षणाच्या आधारावर मंदिराच्या पायाची खोली ठरवली जाईल. पायाची खोली 20 ते 25 फूट असू शकते. राम मंदिराच्या नव्या मॉडेलमध्ये एकूण 318 खांब असणार आहेत.