राम मंदिरासाठी शिवनेरी वरून माती..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे भाजप अस्वस्थ असतानाच आता शिवसेनेने राम मंदिरासाठी शिवनेरीवरून मातीचा कलश नेण्याचा निर्धार केला अाहे.

मुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे भाजप अस्वस्थ असतानाच आता शिवसेनेने राम मंदिरासाठी शिवनेरीवरून मातीचा कलश नेण्याचा निर्धार केला अाहे.

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला रवाना होण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर जाणार असून तिथली माती कलशात भरून ते अयोध्येला नेणार आहेत. शिवनेरी किल्यावरील माती राम जन्म भूमीत मंदिर निर्माणासाठी देण्यात येणार आहे. गुरूवार (ता.22) ला सकाळी 9 वाजता किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे पोहचणार आहेत. 

शिवनेरीवरील माती एका कलशात भरून अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देण्यात येणार असून राम मंदिराच्या बांधकामासाठी शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचाही आधार लाभावा अशी या मागची प्रेरणा असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Web Title: For Ram TEmple gets Shivneris soil