राम मंदिराची उभारणी पुढील वर्षापासून - स्वामी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

अलाहाबाद - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले असून, भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुढील वर्षापासून राम मंदिर उभारणीला सुरवात होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

स्वामी यांनी अलाहाबाद येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना राम मंदिराच्या मुद्द्यावर वक्तव्य केले. स्वामी म्हणाले, की राम मंदिराची उभारणी करण्याची तयारी झाली असून, पुढील वर्षीपासून काम सुरु होईल. अयोध्येत जी मशीद आहे आहे, त्यासाठी शरयू नदीपलिकडे जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. मला आशा आहे, की यासाठी मुस्लिम नागरिक तयार होतील. सर्वोच्च न्यायालयात लवकरच राम मंदिराची सुनावमी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर बोलताना स्वामी म्हणाले, पंतप्रधानांचा हा निर्णय खूप धाडसी होता. या निर्णयामुळे नागरिकांना ज्या अडचणी येत आहेत. त्यासाठी पंतप्रधान नाहीतर अर्थमंत्री अरुण जेटली जबाबदार आहेत. 

Web Title: ram temple will be the starting to built next year says subramanian swamy