अलवर बलात्काराची सीबीआय चौकशी करा - पासवान

अलवर बलात्काराची सीबीआय चौकशी करा - पासवान

नवी दिल्ली ः राजस्थानातील अलवर येथे एका दलित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज केली.

निवडणुकीच्या काळात फटका बसू नये, म्हणून राज्यातील कॉंग्रेसच्या सरकारने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पासवान यांनी केला. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी असलेल्या पासवान यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील लोकसभेच्या निवडणुका संपेपर्यंत याप्रकरणी राज्य सरकारने गुन्हा दाखल होऊ दिला नाही.

बलात्काराची ही घटना 26 एप्रिल रोजी घडली असून, याप्रकरणी सात मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हेगारांना कठोस शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com