CAA Protest : इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासह आंदोलक ताब्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

महात्मा गांधींचे पोस्टर घेऊन मी आंदोलन करत असताना पोलिसांनी मला ताब्यात घेतले. माध्यमांतील संविधानाविषयी मी बोलत होतो.

बंगळूर : देशभरात लागू झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करत असताना बंगळूर पोलिसांनी ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासह 30 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बंगळूरमध्ये कर्नाटक पोलिसांनी जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे. तरीही आज बंगळूरमधील टाऊन हॉल येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रामचंद्र गुहा यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. बुधवारी रात्री याठिकाणी अनेक आंदोलक जमा झाले होते. तेव्हाच आज आंदोलन करण्याचे निश्चित झाले आहे. बंगळूरसह दिल्ली, उत्तर प्रदेशात आज या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

जामिया हिंसाचारावर अखेर प्रियांका चोप्रा बोलली, म्हणाली...

रामचंद्र गुहा म्हणाले, की महात्मा गांधींचे पोस्टर घेऊन मी आंदोलन करत असताना पोलिसांनी मला ताब्यात घेतले. माध्यमांतील संविधानाविषयी मी बोलत होतो. कोणत्याही हिंसक घडामोडीशिवाय आम्ही आंदोलन करत होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramachandra Guha Detained During Citizenship Act Protest In Bengaluru