
Ramadan 2023 : रमजान महिन्याला सुरुवात, आज पहिला रोजा, जाणून घ्या सहरी अन् इफ्तारचा वेळ
मुस्लीम समुदायातील रमजान महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्याची सुरुवात चंद्राला पाहून होते. रमजान महिना हा कधी 29 दिवसाचा असतो तर कधी 30 दिवसाचा असतो. रमजान महिना सुरू होताच मुस्लीम लोक रोजा म्हणजेच उपवास ठेवतात.
24 मार्च म्हणजेच आजपासून रमजान सुरू झालाय आणि आज पहिला रोजा आहे. रमजानमध्ये प्रत्येक मुस्लीम बांधवाने रोजा ठेवणे गरजेचे असते. रोजाची सुरवात सकाळी सहरीने केली जाते आणि मग सायंकाळी इफ्तार करुन रोजा सोडला जातो. (Ramadan 2023 Iftar and Sehri time Islamic Holy Month Fasting Rules)
असंही म्हणतात की रमजानची सुरवात चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून केली जाते. असंही म्हणतात की जर मक्कामध्ये आज चंद्र दिसला तर उद्यापासून रमजान सुरू होऊ शकते. चला तर जाणून घेऊया सहरी अन् इफ्तारची योग्य वेळ.
सहरी काय आहे?
रोजाची सुरवात सकाळी सुर्योदयापूर्वी फज्रच्या अजानसोबत केली जाते. यावेळी सहरी घेतली जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी जेवण केले जाते. यालाच सहरी म्हणतात. सहरी करण्याचा आधीच ठरविला जातो.
इफ्तार काय आहे?
दिवसभर न खाता पिता रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी नमाजचे पठन केले जाते. त्यानंतर खजूर खाऊन रोजा सोडला जातो. हे सायंकाळी सुर्यास्तानंतर सोडला जातो. यालाच इफ्तार म्हटले जाते. त्यानंतर सकाळी सहरीपूर्वी व्यक्ती काहीही खाऊ पिऊ शकतो.

Ramadan Timetable 2023
वरील टेबलवरुन तुम्ही सहरी आणि इफ्तारचा वेळ जाणून घेऊ शकता.
रमजानमध्ये या नियमाचं पालन करावे
या वर्षी रमजानचा महिना पुर्ण 30 दिवसाचा आहे. या वर्षी शेवटचा रोजा हा 21 एप्रिलला असणार. त्यामुळे ईद ही 22 एप्रिलला साजरी केली जाणार. रमजानच्या या महिन्यात काही खास नियमांंचं पालन केलं जातं. जाणून घेऊया ते नियम कोणते?
रमजानदरम्यान रोजा करणाऱ्या व्यक्तीने दिवसातून पाच वेळा नमाजचे पठण करणे गरजेचे आहे
रमजानच्या महिन्यात ईदच्या आधी दान करणे खूप गरजेचे आहे.
दानमध्ये तुम्ही तुमच्या वर्षभराच्या कमाईचा अडीच टक्के हिस्सा गरजूंना दान करणे शुभ मानले जाते.
या महिन्यात इबादत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अल्लाहचे आभार मानले पाहिजे.