Ramayana Express for the devotees now
Ramayana Express for the devotees now

भाविकांसाठी आता "रामायण एक्‍स्प्रेस' 

नवी दिल्ली : प्रभू राम व रामायणाशी संबंधित प्रमुख ठिकाणांची धार्मिक यात्रा घडविणारी रामायण एक्‍स्प्रेस नावाची विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी येत्या नोव्हेंबरमध्ये सोडण्यास रेल्वेने हिरवा कंदील दाखविला आहे. 14 नोव्हेंबरला अयोध्येहून सुटणारी व अयोध्या ते रामेश्‍वरम या मार्गावर धावणारी ही पर्यटन गाडी नाशिक या महाराष्ट्रातील एकमेव स्थानकावर थांबणार आहे. जे यात्रेकरू या गाडीने जाऊन पुढे रावणाची लंका पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी रामेश्‍वरमपासून विशेष विमानही आरक्षित केले जाईल. 

रामायण एक्‍स्प्रेसला अधिकृत प्रारंभ होण्याआधी येत्या 28 ऑगस्टला चाचणी तत्त्वावर याच मार्गावरून एक गाडी सोडली जाईल. या एक्‍स्प्रेसचा खटाटोप म्हणजे मोदी सरकार "इलेक्‍शन मोड'मध्ये आल्याचे हे निदर्शक असल्याचे जाणकार मानतात. दोन्ही देशांची यात्रा 16 दिवसांची राहील. या गाडीचे सुरवातीचे ठिकाण नवी दिल्लीचे सफदरजंग स्थानक असेल. तेथून ती अयोध्येला जाईल व आपली "यात्रा' सुरू करेल. या प्रस्तावित गाडीच्या डब्यांवरील व आतील चित्रकाम व इतर सजावटीवर रेल्वे मंडळ विचार करत आहे. येत्या 28 ऑगस्टला सुटणारी गाडी तिरुअनंतपुरम, रामेश्‍वरम, पंचवटी, चित्रकूट, श्रृंगवेरपूर, वाराणसी, दरभंगा, सीतामढी व अयोध्या असा प्रवास करेल. नऊ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी साठी सुमारे 40 हजार रुपये तिकीटदर असतील. 
 

गाडीचा मार्ग आणि दर 

अयोध्या-नंदीग्राम-सीतामढी-जनकपूर-वाराणसी-अलाहाबाद (प्रयागराज)-श्रुंगवेरपूर-चित्रकूट-नाशिक (पंचवटी)-हंपी-रामेश्‍वरम. त्यासाठी माणशी 15 हजार 120 रुपये प्राथमिक तिकीटदर (बेस फेअर) आहेत. यात्रेकरूंना जेवणखाण, धर्मशाळा-हॉटेल, पर्यटन स्थळांची सफर व यात्रा व्यवस्थापक या सुविधा पुरविल्या जातील. रामेश्‍वरमपासून लंकेला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी चेन्नईहून विमानाचे आरक्षण केले जाईल. त्यासाठी सुमारे 37 हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. श्रीलंकेतील पाच ते सहा दिवसांच्या मुक्कामात त्यांना रामायणाशी संबंधित अशोकवन व इतर स्थळे पाहता येतील. 

अलाहाबादच्या नामबदलाच्या हालचाली 

प्रयाग असलेल्या अलाहाबादचे नाव बदलून ते प्रयागराज करण्याच्या हालचाली योगी आदित्यनाथ सरकारने गतिमान केल्या आहेत. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार बादशहा अकबराने या क्षेत्राचे नाव बदलून अल्लाहाबाद केले. नंतर त्याचा अलाहाबाद असा अपभ्रंश झाला. येथे पुढील वर्षीच्या (2019) जानेवारीत सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्याआधी अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या जोरदार हालचाली आहेत. नामबदलाची ही मूळ कल्पना येथील माजी खासदार व सध्या भाजपचे मार्गदर्शक डॉ. मुरली मनोहर जोशी यांची आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com