आठवलेंच्या कवीतांनी उडाले संसदेत हास्यांचे फवारे

ramdas athawale
ramdas athawale

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवीतांनी संसदेत हास्यांचे फवारे उडाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसत होते.

आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कोपरखळीही मारली. ते म्हणाले की, "आम्ही आता तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही. मोदी सरकार पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणूक जिंकणार." यावेळी राहुल गांधी सभागृहातच उपस्थित होते आणि ते आठवलेंच्या भाषणादरम्यान हसतही होते.

जेव्हा तुमचं सरकार होतं, तेव्हा मी तुमच्यासोबत होतो, असे आठवले बोलताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. निवडणुकीआधी काँग्रेसवाले आमच्याकडे या असे बोलत होते. परंतु, मी वाऱ्याची दिशा ओळखली होती की मोदींची हवा आहे, आठवलेंच्या या वाक्यानंतरही सगळेच हसू लागले. दरम्यान, आठवले लोकसभा खासदार नाहीत. परंतु, मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख असल्याने त्यांना इथे भाषण केले.

आठवले यांची कविता...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे सभागृहात कविता केली.

"एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिर्ला ओम

लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम

नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल

हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल

आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान

भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com