शरद पवार यांनी NDA मध्ये येऊन राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हावे : आठवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये यावे आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे, असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदाव आठवले यांनी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

नागपूर : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये यावे आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे, असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदाव आठवले यांनी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

पत्रकारपरिषदेत बोलताना आठवले म्हणाले, "देशाचे संविधान बदलले जाणार अशी टीका काँग्रेस करत आहे. मात्र मला तसे अजिबात वाटत नाही. सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आमचा विश्‍वास आहे.'

■ आठवले यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे

  • भारतीय जनता पक्षा पक्ष हा हा बहुजनांचा पक्ष झाला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात आदर आहे.
  • काँग्रेसने मोदी यांच्या धोरणांना पाठिंबा दिला पाहिजे.
  • भाजप सरकार मुस्लिम विरोधात आहे, असा भ्रम विरोधीपक्ष पसरवित आहे, मात्र मुस्लिमांच्या अजिबात विरोधात नाही.
  • भाजप सरकार आले म्हणून उत्तर प्रदेशमधील सहारनपुर येथे दलितांवरचे अन्याय वाढले असे अजिबात नाही.
  • समाजवादी पक्षाचे सरकार होते तेव्हादेखील दलितांवर अत्याचार होत होते.
  • 2019 ची निवडणूक आम्ही जिंकणार यात दुमत नाही.
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे या मताचे आम्ही आहोत.
  • उद्धव ठाकरे यांनी कर्ज माफीच्या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडू नये. सरकारसोबतच राहवे.
Web Title: Ramdas Athawale sharad pawar president election nda bjp congress saharanpur sp